अश्या ओल्या राती…
अश्या ओल्या राती तुझ्या आठवणींची साथ,
तुझीच गीते गात प्रिये मेघ हे बरसतात…
धावतो हा वारा सुसाट भेटीस ग तुझ्याच स्वच्छंद,
मंद श्वासापरी तुझ्या दरवळतो हा मृदगंध…
रिमझिम तालावर मग ह्या नाचतो मनाचा मोर,
लाजुनी कशी ही बघ ना लपते चंद्राची नाजूक कोर…
डोळ्यातून तुझ्या मी बघतो मग स्वप्नांची ती फुलबाग,
सागरापरी अथांग प्रीतीचा तो मुग्ध अनुराग…
ही दूरी, हे अंतर, फसवेच ग हे सगळे भास,
तुझ्यासवेच मी आहे, खरी तेव्हढी ती आस..
तुलाही असाच ना छळतो? पावसाची ही बेइमानच जात,
नेहमीच जाळत जाते मजला ही ओली रात…
अश्या काळ्या राती ना मिळे कुणाचीच साथ,
शोषून घेत अंधारही कृष्णमेघ हे दाटतात…
थांबतो निश्चल मग तोही वारा होता मन हे कुंद,
आसूड नभी वीज ओढी यातना क्षणिक अनंत…
शोधे ग्रासलेला चंद्र वेडापिसा तो चकोर,
कसे जगावे वेडयाने फक्त वेडया आशेवर…
फसवी होती का ती स्वप्ने अन मृगजलापरी त्या फुलबागा,
कसा तुटला अचानक तो प्रीतीचा अखंड धागा…?
ती नजर, ते हास्य अन तो रुसवा आठवतात अजूनही ते सारे तुझे बहाणे,
गुंतवून मला तव सृष्टी स्वतः मोकळेच राहणे…
अजूनही झपाटलेल्या संध्येला मी धरतो हाती ते तुझे हात,
अन मग भानावर येता डसते मनी ही काळी रात…
Hi all, have tried to write similar poems reflecting contrasting moods… Hope you like it… Your valuable feedback is requested. Thanks!
changala prayatna ahe re….!!! marathit pan lihayala lag… 🙂
Thanks Swanand!!!! karin prayatna nakki… 🙂
तुझी वही आत्ताशी बाहेर पडायला लागलीये 🙂 ( मराठी 😉 ) खूप भारी 🙂